नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. एका एपीआयमुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर होणार नाही. चंद्रशेखर यांचं दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळलं होतं, मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही, असे विधान संजय राऊत यांनी केल आहे. ते दिल्लीत बोलत होते.
‘एका एपीआयवरुन काय घडामोडी घडणार? काल याबाबत शरद पवारांनीही सांगितलंय. महाराष्ट्राचं सरकार स्थिर आहे. चंद्रशेखर यांचे सरकार दोन हवालदारांनी पाडलं होतं. दिल्लीत दारात उभे राहिलेल्या हवालदारांमुळे सरकार कोसळलं होतं. तसं महाराष्ट्रात सरकार अस्थिर झालंय या भ्रमातून बाहेर पडायला हवं’ असही संजय राऊत म्हणाले आहेत.
मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेरील तपासाबाबत NIA, ATS तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणा तपास करत असताना हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही. मात्र आमचं तपासावर लक्ष आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासी संबंधित असेल तर चुकीचं आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे. खातेबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित, कुणाला काय द्यायचं हे ते ठरवतात, पण हे तीन पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा पारंपारिक मच्छीमारांसाठी आंदोलन छेडणार ; बच्चू कडूंचा इशारा
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १०० टक्के माफ; परभणी मनपाचा निर्णय
- बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्राध्यापिका नीता अंबानी देणार विद्यार्थ्यांना धडे
- जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, एका दिवसात ११६ रुग्ण
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

