Share

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्राध्यापिका नीता अंबानी देणार विद्यार्थ्यांना धडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बनारस हिंदू विद्यापीठामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

रिलायन्स फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून नीता अंबानी महिला सशक्तीकरणासाठी बरेच काम करतात. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच महिला सशक्तीकरणाशी निगडीत शैक्षणिक आणि संशोधन काम या केंद्रामध्ये सुरू असते. हे केंद्र जवळपास 20 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले असून इथे मानद प्राध्यापकाच्या 3 जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर अंबानी यांना प्राध्यापक नियुक्त केल्यास महिलांना त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळू शकेल. अस मत केंद्राचे प्रमुख असलेल्या कौशल किशोर मिश्रा यांनी व्यक्त केल आहे. नीता अंबानी यांच्याव्यतिरिक्त मानद प्राध्यापक पदासाठी उद्योगपती गौतम अडाणी यांच्या पत्नी प्रीती अडाणी आणि उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नी उषा मित्तल यांच्याही नावाचा विचार सुरू असल्याचंही विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मात्र या प्रस्तावाला काही विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. मंगळवारी कुलगुरु राकेश भटनागर यांच्या निवासस्थानाबाहेर 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या नीता अंबानी यांना मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करून विद्यापीठ चुकीचा पायंडा पाडत असल्याचं या विद्यार्थी संघटनांनी म्हटलं आहे. या विद्यार्थी संघटनांनी आरोप केला आहे की विद्यापीठातील मंडळी हे विद्यापीठ भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला सशक्तीकरणाचेच धडे द्यायचे असतील तर मग अरुणिमा सिन्हा, बचेंद्री पाल, मेरी कोम, किरण बेदी सारख्या मान्यवरांना आमंत्रित करा अस देखील यावेळी या विद्यार्थी संघटना म्हणाल्या

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!