🕒 1 min read
परभणी: परभणी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, शहरातील नागरिकांकडे असलेल्या घरपट्टी तसेच नळपट्टीच्या थकबाकीवरील व्याज शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्च पर्यंत नागरिकांनी त्यांच्याकडील नळपट्टी व घरपट्टी भरण्याचे आवाहन मनपाने केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना तसेच आर्थिक परिस्थितीवर गदा आलेली असताना मनपाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
येथील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी व नळपट्टीची थकबाकी आहे, या थकबाकीमुळे महापालिकेसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. असे असले तरी कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात तसेच सर्व स्तरावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. काहींचे धंदे बसले आहेत तर काहींचे पगार अडकले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत मनपाने घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी १६ मार्च ते ३१ मार्च पर्यंत होणार आहे, तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाने केले आहे.
परभणीचे मनापा आयुक्त देविदास पवार म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून या दृष्टीने पाऊल उचलले आहे, नागरिकांनी या व्याज माफीचा लाभ घ्यावा, मालमत्ता व पाणीपट्टीची थकीत रक्कम जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
- जनतेने नाकारले म्हणूनच केजरीवाल सरकारला काम न करू देण्याचे भाजपचे धोरण ?
- तुळजापुर पोलीसांची मोठी कारवाई, कुंटणखाना चालवणाऱ्या नऊ महिलांना अटक
- ‘त्या’ सभेतील दिलीप गांधींचे पाणावलेले डोळे आठवून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर !
- तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचे ‘हे’ खरे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
