औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील न्यु हनुमाननगर गल्ली क्रमांक ४ येथे राहणाऱ्या आकाश अर्जुन चाटे (वय २२) या युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) सकाळी उघडकीस आली. आकाश चाटे याने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चाटे हा शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असतांना चुकीची संगत लाभल्याने तो किरकोळ स्वरूपाचे गुन्हे करीत होता. आकाश चाटे याने घरातील स्लॅबला असलेल्या सिलींग पंख्याच्या हुकाला साडीच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
आकाश चाटे याच्या कुटुंबियांनी आणि पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला फासावरून खाली उतरवून उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

