मुंबई: चंद्रकांत पाटलांसारखे पुढारी आजही सांगतात, राज्य भाजपच्या हातात आले तर 24 तासांत ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. हे कशाच्या आधारावर? हे खरे असेल तर सरकारने पाटलांच्याच अंगावर काळा डगला चढवून त्यांना राज्याचे वकील म्हणून उभे करायला हरकत नाही. प्रश्न श्रेयाचा नसून ओबीसींना न्याय देण्याचा आहे. नुसत्या तोंडपाटीलक्या नकोत. करून दाखवा! असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपला दिले आहे.
महाराष्ट्र सरकारने काही योजना करावी. त्या बरहुकूम कामास गती द्यावी व न्यायालयाने नेमकी उलटी भूमिका घ्यावी. हे आता राज्याच्या अंगवळणी पडले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका घ्या व त्याबाबत दोन आठवड्यांत अधिसूचना काढा. असे आदेश सुप्रीम कोटनि निवडणूक आयोगास दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना पाठबळ देण्याच्या सरकारच्या भूमिकेस खो बसला आहे व त्याबद्दल राज्यातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष खूश झाला आहे. या प्रकरणांत सरकारची कोंडी झाली याचा विरोधकांना आनंद होणे समजू शकतो, पण ओबीसींचे नुकसान झाल्याची खंत त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत नाही. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास राज्यांतील सर्वच राजकीय पक्षांनी असहमती दर्शविली होती. ओबीसी संदर्भातील ‘डाटा’ केंद्र सरकारने पुरवावा, अशी राज्य सरकारची भूमिका होती व केंद्राने तेथे आडकाठी केली. आरक्षणसंदर्भातील डाटा गोळा करण्यास सरकार कमी पडेल, असा आरोप आता देवेंद्र फडणवीस वगैरे विरोधक करतात ते योग्य नाही. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याच्या विधिमंडळाने केलेला कायदाही फेटाळून लावला. पुन्हा 2020 मधील प्रभाग रचनाच कायम राहतील, असे सुप्रीम कोटनि स्पष्ट केले. आता सुप्रीम कोर्ट प्रभाग रचनेतही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कामात हस्तक्षेप करीत असतील तर पंचायतराज संकल्पनेलाच धक्का बसतो. हे आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हवे. असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर-पॉवेलनं मारलं मैदान..! सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक!
- IPL 2022 DC vs SRH : एकच मन किती वेळा जिंकशील..! उमरान मलिकनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; SPEED पाहून वाटेल अभिमान!
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नरचा ‘बदला’पूर तर पॉवेलकडून धुलाई..! दिल्लीचा हैदराबादसमोर २०७ धावांचा डोंगर
- १२ दिवसांनंतर पती-पत्नीची भेट! रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर
- “राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली” ; किरीट सोमय्यांची भावना

