Share

IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर-पॉवेलनं मारलं मैदान..! सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये स्पर्धेच्या अर्धशतकी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला (DC vs SRH) २१ धावांनी मात दिली आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद ९२ धावा आणि रोवमन पॉवेलच्या स्फोटक ६७ धावांच्या जोरावर दिल्लीने २०७ धावांचा डोंगर उभारला. पॉवेलने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत दे-दणादण फटकेबाजी केली. प्रत्युत्तरात निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादचा संघ २० षटकात १८६ धावांपर्यंत पोहोचू शकला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

हैदराबादचा डाव

दिल्लीच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. स्पर्धेत फॉर्मात खेळणाऱ्या अभिषेक शर्माला (४) खलील अहमदने तर एनरिक नॉर्कियाने कप्तान केन विल्यमसनला (४) झेलबाद केले. राहुल त्रिपाठीला (२२) माघारी धाडण्यात मिचेल मार्शने यश मिळवले. त्यानंतर एडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांनी झुंज दिली. मार्करामने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. खलीलने त्याला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर पूरनने एकहाती फटकेबाजी केली. १८व्या षटकात शार्दुल ठाकूरने पूरनला बाद केले आणि हैदराबादच्या आशा संपुष्टात आणल्या. पूरनने ३४ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकार ठोकत ६२ धावांची झुंज दिली. २० षटकात हैदराबादने ८ बाद १८६ धावा केल्या. दिल्लीकडून खलील अहमदने ३ तर शार्दुल ठाकूरने २ बळी घेतले.

दिल्लीचा डाव

डेव्हिड वॉर्नरसह सलामीला आलेल्या मनदीप सिंगला हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर आलेले मिचेल मार्श (१०) आणि ऋषभ पंत (२६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मार्शला सीन एबॉटने तर पंतला श्रेयस गोपालने तंबूत पाठवले. वॉर्नरने एका बाजूने किल्ला लढवत अर्धशतक पूर्ण केले. स्फोटक फलंदाज रोवमन पॉवेलला १८ धावांवर विल्यमसनने जीवदान दिले. पॉवेलने १७व्या षटकात चांगली फटकेबाजी करत या जीवदानाचा फायदा उचलला. वॉर्नर-पॉवेल यांनी शतकी भागीदारी केली. २०व्या षटकात पॉवेलने उमरान मलिकला षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. या षटकात पॉवेलवने १९ धावा ठोकल्या आणि दिल्लीला दोनशेपार पोहोचवले. २० षटकात दिल्लीने ३ बाद २०७ धावा केल्या. वॉर्नरने ५८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ९२ तर पॉवेलने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६७ धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची Playing 11

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!