मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लीगचा ५०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा तेजतर्रार गोलंदाज उमरान मलिकने यंदाच्या हंगामातील वेगवान चेंडू टाकला. दिल्लीचा संघ फलंदाजी करत असताना उमरानने २०व्या षटकात हा चेंडू टाकला. उमरानच्या गोलंदाजीचा वेग सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
उमरानने २०व्या षटकातील चौथा चेंडू १५७ किमी प्रतितास इतक्या वेगाने टाकला. दिल्लीचा स्फोटक फलंदाज रोवमन पॉवेलने हा चेंडू तितक्याच ताकदीने टोलवत सीमारेषेपार केला. उमरानच्या या षटकात पॉवेलने १९ धावा ठोकल्या. उमरानने ४ षटकात एकही बळी न घेता ५२ धावा खर्च केल्या. उमरान महागडा ठरला असला, तरी त्याचा हा चेंडू सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Only Shaun Tait has bowled a faster delivery (157.71 kmph) than Umran Malik in the 15-year history of IPL.
????: Disney+Hotstar#IPL2022 pic.twitter.com/gNFf6vo3lX
— CricTracker (@Cricketracker) May 5, 2022
दिल्लीचा डाव
डेव्हिड वॉर्नरसह सलामीला आलेल्या मनदीप सिंगला हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर आलेले मिचेल मार्श (१०) आणि ऋषभ पंत (२६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मार्शला सीन एबॉटने तर पंतला श्रेयस गोपालने तंबूत पाठवले. वॉर्नरने एका बाजूने किल्ला लढवत अर्धशतक पूर्ण केले. स्फोटक फलंदाज रोवमन पॉवेलला १८ धावांवर विल्यमसनने जीवदान दिले. पॉवेलने १७व्या षटकात चांगली फटकेबाजी करत या जीवदानाचा फायदा उचलला. वॉर्नर-पॉवेल यांनी शतकी भागीदारी केली. २०व्या षटकात पॉवेलने उमरान मलिकला षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. या षटकात पॉवेलवने १९ धावा ठोकल्या आणि दिल्लीला दोनशेपार पोहोचवले. २० षटकात दिल्लीने ३ बाद २०७ धावा केल्या. वॉर्नरने ५८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ९२ तर पॉवेलने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६७ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

