🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये. आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात. काँग्रेस काळात देखील मोठी मंदी आली होती. मात्र मनमोहन सिंह यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं अशा शब्दात कॉंग्रेसच कौतुक करत शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारला घराचा आहेर दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात, असे ते म्हणाले. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका लागतील. राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.
तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी स्वतः काल मी आहे तिथे बरं आहे असं वक्तव्य केल्याने चित्र स्पष्ट झालं आहे. सगळ्यांना आमच्या पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत, असे ते म्हणाले. भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. आम्ही देखील तयारी करत आहोत, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-
मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा मी दिल्लीत जायला तयार- मुख्यमंत्री
-
‘काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत, विधानसभा निवडणूक एमआयएमसोबतच लढविणार’
-
सोलापुरमध्ये शिवसेना फुंकणार विधानसभेचं रणशिंग, मेळावा घेत करणार स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
