Share

‘काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत, विधानसभा निवडणूक एमआयएमसोबतच लढविणार’

Published On: 

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एका बाजूला कॉंग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत सुरु आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या मनसुब्यांना अक्षरशः सुरुंग लावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नसल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते.

काँग्रेसनं आमच्या पक्षावर भारतीय जनता पक्षाची ‘ब’ संघ असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य लढा भाजपशी आहे, आणि काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. एमआयएमसोबतच ही निवडणूक लढली जाईल, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या ८० जागांवर सर्व जाती धर्मातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल, असं ते म्हणाले.

एमआयएम मराठा-ब्राम्हण-एससी-एसटीसह सर्व समाजातील उमेदवार उभे करणार – जलील

 

30 वर्ष पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा उद्या शिवसेनेत प्रवेश ?

 

MPSCचा मोठा निर्णय : STIची मुख्य परीक्षा ढकलली पुढे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!