Share

संजय राठोड गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत : अजित पवार

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरा पासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.

यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीय. मातोश्रीवरून तसे आदेशच आहेत. आजच मंत्री गायब असले तरीही वन मंत्रालयाचे कामकाज सुरू असल्याची बातमी आली होती. आता संजय राठोड कधी समोर येणार यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच खुलासा केला आहे.

संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार म्हणालेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच- सहा दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!