मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. ‘महिलांवरील अत्याचारला आळा बसावा म्हणून आंध्रप्रदेशने दिशा कायदा आणला. महाराष्ट्रात सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते. आता राज्यसरकारचा सत्ताधार्यांसाठी नविन कायदा भक्ती करा कांड केल्यावर सहिसलामत सुटण्याची युक्ती देत मुक्ती देणार’, अशा आशयाचे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महिलांवरील अत्याचारला आळा बसावा म्हणून आंध्रप्रदेशने दिशा कायदा आणला
महाराष्ट्रात सरकारची“शक्ती”मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होतांना दिसते
आता राज्यसरकारचा सत्ताधार्यांसाठी नविन कायदा
भक्ती करा कांड केल्यावर सहिसलामत सुटण्याची युक्ती देत मुक्ती देणार— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना मिळते – रावसाहेब दानवे
- इंधन-गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार – नाना पटोले
- संजय राठोडांना राज्य सरकारची साथ ? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- पंजाबमधील पराभवावरून ‘फार्मर मेक इंडिया’ म्हणत मातोंडकरांचा भाजपवर निशाणा !
- गावकऱ्यांची साथ आणि पाणी फाउंडेशनचा मदतीचा हाथ घडवणार ‘जलक्रांती’


