Share

तिन्ही आयुक्तांनी कमांड कंट्रोल सेंटरची केली पाहणी

Published On: 

औरंगाबाद : शहरात ७०० सीसीटीव्ही कॅमेरे, ५० ठिकाणी डिजिटल डिस्पले बसविण्यासह अनेक महत्त्वाच्या कामांचा स्मार्ट सिटीतील १७३ कोटीच्या एमएसआय प्रकल्पात करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील कमांड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते.

बुधवारी (दि.१७) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पोलीस मुख्यालयातील कमांड कंट्रोल सेंटरची संयुक्त पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.
शहरातील अपराध आणि वाहतुकीवर नियंत्रण व नजर ठेवण्यासाठी ३८३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्या संयुक्त नियोजनाने मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर प्रकल्प अंतर्गत शहरात मुख्य रस्ते व चौकांवर हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सदरील सीसीटीव्ही कॅमेरे च्या लाईव्ह फीड पोलीस मुख्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे ९ बाय ३ आकाराची व्हिडीओ वॉल वर सहज बघता येते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!