Share

प्रकाशजीच असं बोलू शकतात, आंबेडकर नाही ; काकडेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

Published On: 

पुणे : केंद्र सरकार हे राज्य सरकारहुन वाईट आहे. हिंदीमध्ये कवाडी म्हणतात तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या जसं पैसे मिळाले नाही कि पत्नीला मारतो आणि मग त्याच्या लक्षात आलं कि बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग तो घरातलं सगळं सामान विकतो. अन तेही संपलं की तो मग घरच विकतो. मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडा आहे आणि म्हणून इथलं आख्ख विकायला निघाला आहे’ असा एकेरी उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

आता आंबेडकर यांच्या याच वक्तव्याचा समाचार भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी घेतला आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. प्रकाश जी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाही. पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची पायमल्ली करणारे आहे, अशा शब्दांत माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. या महामानवाचे प्रकाश हे नातु आहेत. त्यांच्याकडून आलेले हे वक्तव्य लज्जास्पद आहे. त्यांनी घटनात्मक पदावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने राज्यघटनेची झालेली पायमल्ली ही थेट डॉ बाबासाहेब यांच्या विचारांचीच पायमल्ली आहे.

प्रकाश आंबेडकर हे सवंग प्रसिद्धी मिळणारी वक्तव्य करून राजकारण करीत आले. त्यांना अशी वक्तव्य करून स्टार व्हायचे आहे. परंतु, ते बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम न राहिल्यानेच जनतेने त्यांना नाकारले आहे. आतापर्यंत ते चारवेळा लोकसभेची निवडणूक हारले. तसेच विधानसभेतील निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिका, नगरपालिकांतही त्यांना विजय मिळवता आला नाही. देवेंद्र फडणवीस जमिनीवर आहेत म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली 105 आमदार निवडून आले प्रकाश आंबेडकर जमिनीवर नसल्याने सगळीकडे हारले. त्यांनी जमिनीवर यावे.

प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांच्या घराण्यातील असल्यानेच त्यांना मान मिळाला. मायावती बाबासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन गेल्या तर, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. परंतु, प्रकाश आंबेडकर सतत हार पत्करत गेले. राजकारणात जेव्हा प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर येतील तेव्हाच जनता त्यांना स्वीकारतील.

रामदास आठवले बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे ते खासदार झाले, मंत्री झाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घटनात्मक पदांचा व राज्यघटनेचा सन्मान करावा तेंव्हाच त्यांचाही लोक सन्मान करतील ही अपेक्षा आहे, असेही माजी खासदार संजय काकडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!