नागपूर : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. रेकॉर्डब्रेक पावसामुळे गावागावातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहून पाणी शेतात घुसलं. काही ठिकाणी तर पाण्याच्या प्रवाहाने पिकासोबतच शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे एकीकडे घराचं नुकसान तर दुसरीकडं उपजीविकेचं साधन असलेल्या शेतीच नुकसान झाल्यामुळं आता परत उभं तरी कसं राहायचं अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत.
विविध नेत्यांसह मंत्र्यांनी देखील जिल्ह्यांमध्ये दौऱ्याचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही प्रत्यक्ष मदत जाहीर न केल्यानं विरोधी पक्षाने टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करत, सरकार चालवायला दम लागतो असा घणाघात केला होता.
यावर, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जेव्हा राज्यात फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे यांचाच दम होता त्यामुळे त्यांना दम विचारण्याचा काहीच विषय नाही, असं बच्चू कडू म्हणालेत. उद्धव ठाकरेंचा दम त्यांना नसता तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नसते, असा टोला कडूंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- आली समीप घटिका ? जयंत पाटलांच्या टीकेला खडसेंचं समर्थन
- एमआयएम-वंचितला खिंडार,असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- सरकारवर टिका करण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावा ! ; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला
- मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ? ; फडणवीस उत्तर द्या : अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

