Share

प्लाझ्मा थेरपी लवकरच बंद ! आयसीएमआरचा संकेत…

Published On: 

नवी दिल्ली: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना रोगावर लस निर्माण झालेली नाही. मात्र सुरुवातीपासूनच करुणा या आजारावर लक्षणानुसार औषधांच्या सहाय्याने उपचार केले गेले. यामध्ये रेमदेसिविर, हाइड्रॉक्सीक्लोरोकॉइन, इंटरफेरोन – बी, लोपिनाविर, पायाभूत उपचार तसेच प्लाजमा थेरेपी चा देखील वापर केला गेला. मात्र वेळोवेळी या उपचार पद्धतींमध्ये बदल देखील करण्यात आला. तर आता कोरोनाच्या उपचारासाठी देशभरात मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे संकेत अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. ही थेरपी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी परिणामकारक नसल्याचा निर्वाळा देताना यामुळे मृत्यू दर रोखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे ही थेरपी उपचाराच्या यादीमधून वगळण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आज आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गावा यांनी दिली.

आयसीएमआरतर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील माहिती देण्यात आली. या अगोदरही प्लाझ्मा थेरपीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत होती. त्यातच आता ही उपचार पद्धती बंद करण्यात येत असताना ‘अँटिसेरा’ ही पद्धत वापरण्याचे संकेत यावेळी आयसीएमआरतर्फे देण्यात आली आहे.

प्लाझ्मा थेरपी बंद करण्याचे संकेत देताना बलराम भार्गावा म्हणाले की, कोरोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझ्मा थेरपी परिणामकारक दिसून येत नसल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे आयसीएमआरने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ही उपचारपद्धती वगळण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!