Share

वाढदिवसासाठी सुट्टीवर येणार होता, पण त्याआधीच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण

Published On: 

सांगली: भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण याच्यावर शिगाव, तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले. रोमितच्या मित्रांनी एकच टाहो फोडला. आपल्या जवान मित्राला साश्रु नयनांनी आखरेचा निरोप दिला. तत्पूर्वी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रोमितचे पार्थिव शिगाव येथे त्याच्या घरी दाखल होताच गावच्या सुपत्राचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आई, वडील, बहीण, नातेवाईक, मित्र, गावकरी यांनी रोमितचे पार्थिव पाहताच एकच टाहो फोडला.

काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षभरापासून तो काश्मीरमध्ये सेवा बजावत होता. दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीहून परत गेल्यानंतर त्याचे काश्मीरमधील सोफियाँ भागात पोस्टिंग झाले होते. तीन मार्चला त्याचा वाढदिवस असल्याने तो पुन्हा सुट्टीवर येणार होता. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!