मुंबई : अमरावती येथे एक सभेला औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संबोधित केलं. या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाही यावेळी त्यांनी अनेक खुलासे देखील केले आहेत.
एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं, असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो, तेव्हा मास्क लावून असायचे, आता सरकार गेलं आणि मास्कही गेलं, खुर्ची गेली आणि कोरोनाही गेला, ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे, टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे, असा जोरदार टोला संदीपान भुमरे यांनी लगावला.
आम्ही सगळ्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार केलं असल्याचं यावेळी भुमरेंनी सांगितलं आहे. आम्हाला गद्दार म्हणायचा यांना अधिकार नसूनजेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हापासून आमचा विरोध होता, पण आमचं ऐकायला कोणीच नव्हतं, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, मी कॅबिनेट मंत्री होतो तरीही मी माझं पद धोक्यात टाकले. कारण आम्हाला शिवसेना वाचवायची होती. बाळासाहेबांचे विचार वाचवायचे होते. खरी गद्दारी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायचा त्यांना अधिकारच नाही. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरे सरकार चालवत होते, असा दावाही संदीपान भुरे यांनी केला.
मबत्वाच्या बातम्या :
- Health Tips | आयुर्वेदिक पद्धतीने डोकेदुखीवर उपाय, हिवाळ्यात या टिप्सचा नक्की करा वापर
- Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण
- Abdul Sattar । 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात सामिल होणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
- Raj Thackeray | “राज ठाकरेंचं ऐकलं असतं तर…” मनसे नेत्याचा गौप्यस्फोट


