हिवाळ्यात अनेक समस्या येतात. या समस्यांमध्ये डोकेदुखी खूप सामान्य आहे. याशिवाय डोकेदुखीची इतरही अनेक कारणे आहेत, जसे की मानसिक ताण, अशक्तपणा, बद्धकोष्ठता, चिंता, डोळ्यांवरचा ताण. त्याचबरोबर काही आजारांमुळे डोकेदुखीचा त्रासही होतो, ज्यामध्ये सायनस, सर्दी आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर हे हिवाळ्यात डोकेदुखीवर उपाय नक्की वाचा.
हिवाळ्यात डोकेदुखीवर रामबाण उपाय
लसुणाच्या पाकळ्या
हिवाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर लसणाचे सेवन करा. रोज लसूण चघळल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते.
दालचिनी पेस्ट
थंडीत डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी दालचिनीची पेस्ट लावा. यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते. यासाठी दालचिनी बारीक करून कपाळावर लावा आणि काही वेळ राहू द्या. यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.
बदाम
डोकेदुखी कमी करण्यासाठी बदामाचे दाणे तुमच्यासाठी आरोग्यदायी असू शकतात. यासाठी बदाम रात्रभर भिजवून ठेवावेत. आता सकाळी बारीक करून त्यात थोडे गरम तूप मिसळून खावे. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.
धणे आणि खडी साखरेचे पाणी
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी धणे आणि खडी साखरेच्या पाण्यापासून तयार केलेला मिश्रण आपल्यासाठी आरोग्यदायी असू शकतो. हे मिश्रण तयार करण्यासाठी 1 कप पाणी घ्या. ते चांगले उकळवा. यानंतर त्यात 1 चमचे धणे आणि 1 चमचे खडी साखर मिसळा. आता हे पाणी चहासारखे प्या. यामुळे खूप फायदा होईल.
आवळा
डोकेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी आवळा आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण देखील आरोग्यदायी ठरू शकते. यासाठी १ बरणी घ्या. त्यात मोहरीचे तेल आणि थोडा कोरडा आवळा घाला आणि सुमारे 10 दिवस तसच ठेवा. त्यानंतर हे तेल डोक्याला लावा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होईल.
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण
- Abdul Sattar । 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात सामिल होणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
- Raj Thackeray | “राज ठाकरेंचं ऐकलं असतं तर…” मनसे नेत्याचा गौप्यस्फोट
- Upcoming Sport Car | मारुती सुझुकी स्विफ्टचे ‘हे’ नवीन मॉडेल लवकरच होणार लॉंच
- Abdul Sattar | घरात बसून, पडद्याच्या आड बसून चालत नाही, तर …; सत्तारांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

