🕒 1 min read
मुंबई : निवडणुकांचं वारं सध्या राज्यात घुमू लागलं आहे. त्यामुळे पक्षातील नेते विरोधी पक्षावर सडकून टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाचे अंबादास दानवे यांनी मनसे पक्ष भाजपाचा मित्र होऊ पाहत आहे. राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची दुसरी शाखा असल्याचं म्हणत मनसे पक्षावर निशाणा साधला होता. या वक्तव्याला प्रत्युत्तर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे ?
शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी अंबादास दानवे आणि अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर चांगलाच हल्ला केला आहे. संदीप देशापांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, याबद्दल शिवसेना काही बोलणार का? असा खोचक सवालही देशपांडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे –
पुढे बोलतना देशपांडे असंही म्हणाले, हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावं. शिवसेना शरद पवार यांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झाली आहे. आम्ही तरी आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी अंबादास दानवे यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे देशपांडे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raju Srivastav Death | सर्वांना हसवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड! राजू श्रीवास्तव यांचा जगाला अखेरचा निरोप
- Nirmala Sitaraman | ‘मिशन बारामती’साठी निर्मला सीतारामन यांचा पुणे दौरा, 21 कार्यक्रमांचं आयोजन
- Sushma Andhare| शिवसेना महिला नेत्यानं रामदास कदम यांना दिला इशारा म्हणाल्या…
- Supriya Sule | “…तर मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल”
- Shahajibapu Patil | “हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…”; शहाजीबापूंचा अजित पवारांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
