मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल करत भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजपवर तुटून पडा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही प्रत्युत्तर देत चांगलाच टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झालीये, त्यामुळेच ते असे प्रश्न विचारतात. उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राज्यभर दौरे करत करून शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरेंच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केले हे त्यांनी विसरू नये. त्यांना राज ठाकरे यांच्या सभेनंतर आज आठवण होते की आपण हिंदू आहोत.”, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
दरम्यान पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात भूमिका घेतली होती. त्यात राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान उद्या १ मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- संदीप देशपांडे यांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “हिंदुत्ववादाचं कातडं…”
- “…तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “…त्यांनी ‘योगी चालीसा’ वाचावी”, भाजप मंत्र्याला संजय राऊतांचा सल्ला
- “आम्ही भाजपकडून शिकतो..”, रोहित पवारांची जाहीर कबुली
- “कुणाचं हिंदुत्व बोगस आणि कुणाचं…”; नितिन सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार


