Share

“…तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई: काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल करत भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजपवर तुटून पडा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये.”, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

भाजपासाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम ३७० सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावलेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे. थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल! असा इशाराही उपाध्ये यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!