Share

बॉलिवूडला लक्ष्य करत असल्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षभरापासून बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणांमुळे चर्चेत आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं होत. त्यानंतर एनसीबी सातत्याने बॉलीवूडवर निशाण साधून धडक कारवाई करताना दिसत आहे. या कारवाईत एनसीसीबीने मोठ्या कलाकारांची चौकशी देखील केली होती. आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

शाहरूखच्या मुलाला थेट अटक करणं सोप्प म्हणता येणार नाही. पण एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी धडक कारवाई केली आणि आर्यनची कालची रात्र कोठडीत गेली. याआधी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, अशा मोठ्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंसमोर चौकशीसाठी हजर व्हावं लागलं. दरम्यान, समीर वानखेडे आणि एनसीबी फक्त बॉलिवूडलाच लक्ष्य करत आहे का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. तर यावर आता  खुद्द समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे म्हणाले, ‘आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करत आहोत, असा आरोप आमच्यावर अनेकदा लागला आहे. पण याला अर्थ नाही. कोण काय म्हणतं यापेक्षा सत्य काय आहे आणि आकडे काय सांगतात, ते महत्त्वाचं आहे. गेल्यावर्षी 10 महिन्यांत आम्ही एकूण 105 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. यापैकी किती सेलिब्रिटी होते, ते सांगा. फक्त मोजके काही जण. यावर्षीही आम्ही 310 जणांना अटक केली, त्यापैकी किती सेलिब्रिटी आहेत? एनसीबीने 150 कोटी रूपयांची ड्रग्ज जप्त केली, पण याची जराही चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले.

सध्या मीडिया आर्यन खानची स्टोरी चालवतो आहे. पण त्याच्या दोन दिवसांआधी आम्ही 5 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. पण मीडियाने त्या स्टोरीत अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही. गेल्या आठवड्यात आम्ही 6 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. त्याचा संबंध अंडरवर्ल्डशी होता. पण एकाही चॅनलने ही न्यूज दाखवली नाही. आमचा एक सहकारी नायझेरियन ड्रग्ज डिलरला पकडताना जखमी झाला, पण कोणीच ही बातमी उचलून धरली नाही. आम्ही एखाद्या लोकप्रिय वा सेलिब्रिटी व्यक्तिला पकडल्यावर मीडिया त्यावर तुटून पडतो. त्यामुळे आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करतो,आरोप आमच्यावर लावू नका, असंही ते म्हणाले. आमची टीम फक्त आपलं काम करते. यात काही सेलिब्रिटी पकडले जात असतील तर त्यांना का सोडायचं? सर्वांसाठी नियम सारखे आहेत आणि नियमांची पायमल्ली करणाºयांना आम्ही सोडणार नाहीच. केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना नियम तोडण्याचा अधिकार मिळत नाही. आम्ही केवळ ड्रग्ज पेडलर्सला पकडावं, केवळ झोपडपट्टीत छापे मारावे, असं होणार नाही, असंही ते म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!