Share

समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यांवरून घेरले त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच आता भीम आर्मीनेही वानखेडेंच्या अडचणी वाढवल्या आहेत.

समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्रं दाखवून सरकारी नोकरी बळकावली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी ते एससी असल्याचं सांगितलं होतं. आरक्षण मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे दाखवली होती, असा आरोप भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीने केला आहे. या दोन्ही संघटनांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रारही केली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची चौकशी सुरू केली. मात्र, त्यापूर्वीच वानखेडेंवर आरोपांमागून आरोप होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!