Share

त्या तिघांना भाजपच्या दबावामुळे सोडण्यात आलं का याचा खुलासा समीर वानखेडेंनी करावा- नवाब मलिक

Published On: 

मुंबई : ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर काही आरोप केले आहेत. तसेच एनसीबीवरही त्यांनी आरोप केले आहेत. यासंबंधी त्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला प्रश्न विचारले आहेत. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

क्रूझ पार्टीमध्ये NCB ने अटक केलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला यांना एनसीबीने काय सोडलं? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. या तिघांना भाजप नेत्यांनी फोन केल्यानंतर सोडण्यात आलं का याचा खुलासा एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी करावं असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं आहे. आपण करत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एनसीबीने अटक केलेल्या तीन लोकांना भाजप नेत्यांच्या दबावामुळे सोडण्यात आलं का? समीर वानखेडे आणि दिल्लीतील तसेच राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची चौकशी करण्यात यावी. समीर वानखेडे तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे. ही सर्व  छापेमारी बनावट आहे. या प्रकरणी केंद्राने एक समितीची स्थापना करावी आणि त्याची चौकशी करण्यात यावी, असंही नवाब मलिका म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!