Share

‘वानखेडे त्यांच्या खबऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करून खोट्या केसेस बनवतात’

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि समीर वानखेडे हे प्रकरण सध्या चांगलेच पेटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वानखेडेंनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस गुन्ह्यात अडकवलं असल्याचा धक्का आरोप त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत नवाब मलिक म्हणाले, एखाद्याच्या घरात कमी प्रमाणात ड्रग्ज सापडलं तर त्याचे प्रमाण वाढवून सांगण्यात येतं. जामीन मिळू नये यासाठी सापडेल्या ड्रग्जचे प्रमाण हे कमर्शियल किंवा इंटरमिजिएट असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला जामीन मिळत नाही. नकली पंचनामे तयार करण्यात येतात. त्या पंचनाम्यामध्ये त्यांना हवं तसं लिहिलं जातं. वानखेडे त्यांच्या खबऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करवून खोट्या केसेस बनवत आहेत असा खळबळजनक आरोप या पत्रात केला आहे.

तर पुढे समीर वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्रवरून म्हणाले, ‘काल जे जन्म प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते त्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे प्रकरण पुढे आणत नव्हतो. भाजपाने या प्रकरणात धर्मावरून प्रश्न उपस्थित केले. मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे.’

‘जी व्यक्ती बोगस जन्म प्रमाणपत्र आणि कागदपत्रे तयार करुन अनुसूचित जातीच्या माध्यमातून नोकरी मिळवतो याबाबत मी प्रश्न उपस्थित केला आहे. मी माझ्या दाव्यावर कायम आहे. मी जे प्रमाणपत्र ट्विट केले आहे ते खरे आहे. त्याच्यावर समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. समीर वानखेडेंच्या बहिणीचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे.’ असे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!