मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली.
तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील एनसीबीचे विभागीय संचालक असलेले समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. त्यापूर्वी नवाब मलिक यांनी त्यांच्यावर काही आरोप करत आता समीर वानखेडे यांच्या वडिलांना आव्हान दिले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक म्हणाले की, ‘काल जे जन्म प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते त्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे प्रकरण पुढे आणत नव्हतो. भाजपाने या प्रकरणात धर्मावरून प्रश्न उपस्थित केले. मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे.’
‘जी व्यक्ती बोगस जन्म प्रमाणपत्र आणि कागदपत्रे तयार करुन अनुसूचित जातीच्या माध्यमातून नोकरी मिळवतो याबाबत मी प्रश्न उपस्थित केला आहे. मी माझ्या दाव्यावर कायम आहे. मी जे प्रमाणपत्र ट्विट केले आहे ते खरे आहे. त्याच्यावर समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. समीर वानखेडेंच्या बहिणीचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे.’
पुढे समीर वानखेडे यांच्या वडिलांनी केलेल्या दाव्याबाबत म्हणाले की, ‘मी दाऊद वानखेडे यांना आव्हान देतो की, माझ्याविरोधात ४९९, ५०० अंतर्गत तक्रार दाखल करा. मुलीनेही आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कऱणार असल्याचं सांगितलं आहे. समीर दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे आणि यास्मिन वानखेडे यांनी दावा दाखल करा असं माझं आव्हान आहे,’ असे मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘या’ वकिलाच्या माध्यमातून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमधून खंडणी वसूल केली’; मलिकांचा गौप्यस्फोट
- वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड कनिष्क जयंत यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

