नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सर्व प्रकरणात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत गर्दी केली. काही जणांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचेही पोस्टर्स हातात घेत गर्दी केली.
आर्यन खान आणि मुंबईतल्या क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी पैसे मागितल्याचा दावा पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आला असून एनसीबीच्या दक्षता समितीचं पथक अंतर्गत तपासासाठी मुंबईत जाणार आहे. मात्र, आता समीर वानखेडे हे स्वतः दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता वानखेडे यांची त्यांच्या पदावरुन बदली होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंना सुरूवातीपासूनच आरोपांचा सामना करावा लागला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते काल रात्री तातडीने दिल्लीला आले आणि आज एनसीबी कार्यालयात दाखल झाले. आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही असं उत्तर वानखेडे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता ते तातडीने दिल्लीला का आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपण मुंबईला गेल्यानंतर याविषयी भाष्य करणार आहोत, असं वानखेडे यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या
- UPSC च्या परीक्षेतील लातूर जिल्हयातील सहा जणांचे यश अनेक युवकांना प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- थोडा प्रयत्न केला तर जे पक्ष सोडून गेले ते आजही पक्षात येऊ शकतात : जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

