मुंबई:- जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान,संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका कोटी रुपयांची ऑफर दिली असा आरोप यात करण्यात आला आहे.
खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाजन यांना चांगलेच टोले लगावले आहेत. कर नाही त्याला डर कशाला? असं सांगत अरविंद सावंत यांनी महाजन यांना थेट भाजप नेत्यांचाच डायलॉग सुनावला आहे.
महाजन यांनी काही केलं नसेल आणि हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नये. राज्यात सत्ताधारी मंडळींवर गुन्हा दाखल झाला किंवा चौकशी झाली तर कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया देऊन भाजप नेते मोकळे होतात. मला वाटतं ही पोलिसांची कारवाई आहे तर त्याची चौकशी होणारच. कर नाही तर डर कशाला? हे आपल्या नेत्याचं वाक्य महाजन यांनी लक्षात ठेवावं, असा चिमटा सावंत यांनी काढला.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- …तर महाराष्ट्राचेही नामांतर करा; महाविकास आघाडीतील घटक पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
- फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
- गिरीश महाजन अडचणी वाढल्या; पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

