🕒 1 min read
पॅरिस: कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जगभरात सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र अनलॉक नंतर उद्योगांना चालना मिळाल्या नंतर आता वाहन उद्योग देखील धावत आहे. यामध्ये वाहनांचे नवनवीन मोडेल्स विकसित झाले असून ते लवकरच बजारात येत असून या वाहनांच्या बुकिंग साठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याच दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहन निर्मिती क्षेत्रात देखील मोठे बदल होत आहेत. नवनवीन वाहनांचे मोडेल्स विकसित होत आहेतच त्याच बरोबर कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे देखील वाहन निर्मीती क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यामध्ये फ्रान्सची प्युजो व इटलीच्या फियाट या कंपन्या जगातील चौथी मोठी वाहन कंपनी अस्तित्वात येणार आहे.
फ्रान्सची प्युजो व इटलीच्या फियाटच्या एकत्रीकरणाला उभय कंपन्यांच्या भागधारकांनी सोमवारी मंजुरी दिली. वर्षांला ८७ लाख वाहननिर्मिती व ५ अब्ज युरोचा समूह याद्वारे आकारास आला असून जगातील चौथी मोठी वाहननिर्मिती कंपनी अस्तित्वात आली आहे.
जगातील आघाडीच्या फोक्सव्ॉगन, टोयोटा व रेनो-निस्साननंतर आता फियाट व प्युजो कंपन्यांचे स्थान असेल. प्युजो आता फियाटच्या अखत्यारित असेल. फ्रेंच फियाटच्या अखत्यारित सध्या सिट्रॉनही आहे. तिची एसयूव्ही गटातील नवी कार भारतात चालू वर्षांत दाखल होण्याची शक्यता आहे.
नव्या विलीनीकरणामुळे युरोपाबरोबरच अमेरिकेतील वाहन बाजारपेठेवर नियंत्रण मिळण्यास उभय कंपन्यांना संधी उपलब्ध होणार आहे. या कंपन्यांचे आता ११ सदस्यीय संचालक मंडळ असेल. कंपनीवर पीएसएचे (फियाट) मुख्याधिकारी कालरेस टॅवेर्स यांचे वर्चस्व असेल. फियाटचे विद्यमान वरिष्ठ अधिकाऱ्यांना समूहात इतर विभाग, क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर नुकतीच अमेरिकेतील फोर्ड मोटर कंपनी आणि महिंद्र अॅण्ड महिंद्र या कंपन्यांनी आपापाल्या स्वतंत्र व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहेत त्यामुळे कंपन्यांकडून हि भागीदारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून शनिशिंगणापूर ग्रामपंचायत 15 वर्षांनंतर बिनविरोध!
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- …तर महाराष्ट्राचेही नामांतर करा; महाविकास आघाडीतील घटक पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
- प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी,आम्ही त्यांच्या मागे उभे राहू : बाळासाहेब थोरात
- गिरीश महाजन अडचणी वाढल्या; पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

