पुणे : जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान,संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका कोटी रुपयांची ऑफर दिली असा आरोप यात करण्यात आला आहे.
जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी 8 डिसेंबर 2020 रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात गिरीष महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही-अजित पवार
- कोरोनानंतर आता ‘या’ राज्यांवर ‘बर्ड फ्लू’चं संकट !
- राज्य सरकारने ‘हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे’ हे कृतीतून दाखवावे : चित्रा वाघ
- मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देण्यासाठी भाजप आक्रमक
- राज्यातील जनता भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाला कदापी माफ करणार नाही : सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

