दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
तर, या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अशातच या शेतकरी आंदोलनाच्या आडून वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा गंभीर आरोप जिओने केला आहे.
नवे शेतकरी कायदे हे अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप काँग्रेससह शेतकरी नेत्यांनी केला होता. यानंतर, सोशल मीडियावर बॉयकॉट जिओ मोहिम सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अंबानी-अदानी यांच्या उत्पादनांवर बहिष्कार करावा असं आवाहन या मोहिमेतून केलं जात आहे.
दरम्यान, आता जिओने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायकडे धाव घेतली आहे. रिलायन्स जिओने आरोप केला आहे की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबच्या शेतकरी आंदोलना आडून जिओ संदर्भात खोटी माहिती देत आहेत. आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. रिटेलर्स आणि एजंट्सद्वारे ग्राहकांना चुकीची माहिती सांगून त्यांना पोर्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
टेलिकॉम सचिव एस. के. गुप्ता यांना पाठवलेल्या पत्रात रिलायन्स जिओने म्हटले की, या दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.वोडाफोन आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतात विविध भागात ग्राहकांना आपल्या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी हा रस्ता अवलंबत आहेत. शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. जिओ विरोधात या कंपन्या खोटा प्रचार करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याआधीच जिओ ने ट्रायकडे यासंदर्भात तक्रार केली होती. मात्र, अजूनही या कंपन्यांचे गैरप्रकार सुरु असल्याचं जिओने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय आहे आज ट्वीटरवरील ‘९३,००० पाकिस्तानी’ हॅशटॅग ट्रेंडींग मागील कारण ?
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- ‘या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही’
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- देशभरातल्या विविध राज्यात कृषी कायद्यांचे स्वागत होत आहे; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

