Share

पक्ष वाढवायचा असेल तर राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला

Published On: 

मुंबई:- राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही. राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले.

यावेळी मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!