🕒 1 min read
मुंबई: मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याबद्दल एका सराफाने एका लेखिकेला अपमानित करून पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर काढल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे.मराठी बाणा दाखवत या लेखिकेने रस्त्यावरच ठिय्या मांडला. या लेखिकेचे नाव शोभा रजनीकांत देशपांडे असे असून त्या कुलाब्याच्याच रहिवासी आहेत. मराठी बोलण्याची मागणी केल्यामुळे या सराफाकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे.
रात्रभर करत असलेल्या शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाला यश आले आहे. ज्वेलर्स जेव्हा घटनास्थळी दाखल झाला तेव्हा त्याला लोकांच्या रोषाला सामोर जावे लागेल. त्यावेळेस ज्वेलर्सला काही लोकांनी मारहाण देखील केली. माध्यमांशी बोलताना ज्वेअर्सचा मालक म्हणाला की, मला मराठी थोडे येते. मुंबईतच माझा जन्म झाला आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. मला माफ करा, असं म्हणतं त्यांने शोभा देशापांडे यांची पाय पकडून माफी मागितली आहे.
मनसेने एंट्री घेत आपला हिसका दाखवल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितल्यानंतर मराठी लेखिका शोभा देशपांडे यांचे सुमारे २१ तासांपेक्षा जास्त काळानंतर मुंबईतील ठिय्या आंदोलन अखेर संपले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास त्यांना असल्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, फादर स्टॅन स्वामींना अटक
- सोलापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; एमआयएम फुटीच्या उंबरठय़ावर
- महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आता भाजपही करणार राज्यभर निदर्शने
- ‘MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात,अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील’
- मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असताना सरकारला एमपीएससी परिक्षा घेण्याची एवढी घाई का आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
