औरंगाबाद : शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय स्वातंत्रपूर्व काळापासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे. या महाविद्यालयाला १०० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाने आता विद्यार्थी विकासासाठी किंवा शैक्षणिक विकासासाठी निधी मागायला हवा, असा खोचक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. एका कार्यक्रमानिमित्त ते शहरात आले असता, त्यांनी महाविद्यातील प्राचार्यांना या बाबत सूचना केल्या.
बुधवारी शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कोव्हीड योद्धांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सामंत आले होते. या दरम्यान शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात प्रवेश करताच प्रभारी प्राचार्य असलेल्या डॉ.आर.एच.सातपुते यांना सामंत यांनी चांगलेच झापले. ‘महाविद्यालयास शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या महाविद्यालयाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेंव्हा विद्यार्थी विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी निधी मागायला हवा. निधी काही फक्त एसी बसवण्यासाठी नाही. हे तुटल ते फुटल सांगण्यापेक्षा पुढील शंभर वर्ष आपल्यामुळे संस्थेचे नाव होईल असे काम करा.’ अशा परखड शब्दात त्यांनी सुनावले.
शासकीय महाविद्यालयाची इमारत खुप जूनी आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येते. मात्र, त्याच बरोबर विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वाचे कार्यही या महाविद्यालयाने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंनी उगाच फुशारक्या मारू नयेत’, विनायक राऊतांचा पलटवार
- एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला
- एट्रॉसिटी प्रकरण; करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
- भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हाला नाही; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

