🕒 1 min read
पुणे : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पत्नीने पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. परंतु आता या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागले आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला, म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं. आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असं सडेतोड उत्तर देत रुपाली चाकणकर यांनी पंकज तडस यांच्यावर टीका केली आहे.
पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्रं होतं. वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता. म्हणून आज विवाह केला. गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी पूजाला विचित्रं वागणूक दिली आहे, तिला वेगवेगळी अमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना समोर आल्यानंतर त्यांना विवाह करावा लागतोय, असंही यावेळी चाकणकरांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळ उद्घाटन; फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ‘ही श्रेयवादाची लढाई नाही, पण..’
- ‘भारतात मुस्लिम कधीच बहुसंख्याक होणार नाहीत’, काँग्रेस खा.दिग्वजिय सिंह यांचा दावा
- ‘देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांची फसवणूक’, एमआयएम खा.ओवैसींची टीका
- नाशिकमधील जलसंपदा कार्यालये औरंगाबादेत आणण्यासाठी प्रयत्न करणार-भागवत कराड
- चिपी विमानतळाचा वाद; उद्घाटनाला राणेंना बोलवण्याच्या मुद्द्यावर सुभाष देसाई म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
