Share

९५ धावांची अपयशी झुंज देणाऱ्या सॅमच्या नावे विश्वविक्रमाची नोंद

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील आखेरचा सामना जिंकत भारताने कसोटी, टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही खिशात घातली आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंडच्या संघाचा २-१ अशा फरकाने विजय मिळवला. आखेरच्या सामन्यात विजय जरी भारताचा झाला असला तरी चर्चा मात्र सॅम करनने दिलेल्या झुंजीची होती. सॅम करनने या सामन्यात केलेल्या नाबाद ९५ धावाच्या खेळीमुळेच भारताला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघासमोर ३३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२२ धावापर्यंत मजल मारू शकला. इंग्लंडकडून या सामन्यात सॅम करनने आखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. सॅम करनने या सामन्यात ९५ धावांची नाबाद खेळी करत एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम करताना सॅमने ख्रिस वोक्सच्या विश्वविक्रमासोबत बरोबरी केली आहे.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सॅम करनने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९५ धावंची खेळी केली. याबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याच्या ख्रिस वोक्सच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. २०१६ मध्ये ख्रिस वोक्सने श्रीलंकेविरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना नाबाद ९५ धावांची खेळी साकारली होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसल आहे. त्याने २०११ साली भारताविरुद्ध ९२ धावांची खेळी साकारली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!