लातूर: वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये उपाययोजना सुरु करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत.
लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी १४ मार्च पासून लागू करण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिल पर्यंत सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. त्याच सोबत बाहेर कोणी विनामास्क फिरत असले तर त्याला पाचशे रुपयांचा दंड बसणार आहेत, तसेच संचारबंदीचे पालन न करणाऱ्यांवर हजार रुपयांचा दंड बसवण्यात येणार आहे. या आदेशांची कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कठोर निर्बंध लावावे लागले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रतिबंधित केलेल्या ठिकाणी उल्लंघन झाल्यास १ हजाराचा दंड आकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंत्यविधीसाठी २० व्यक्तींपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असल्यास कारवाई. पूर्वीच्या आदेशांमध्ये अजून काही नियमांचे समावेश जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ १४ दिवस होम आयसोलेशन असे फलक लावण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालयात देखील अतिमहत्वाचे काम असेल तरच येण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सध्या लातूर जिल्ह्यात राबवल्या जात आहेत, तसेच जे कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- निर्बंध पाळले जात नसतील तर लॉकडाऊनची तयारी करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- रंग बरसे भीगे चुनर वाली…! होळीच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी शेअर केला खास फोटो
- पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य सोबत हार्दिकचा स्टाईलीश डान्स ; पहा व्हिडिओ
- शरद पवारांवर अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया होणार; पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
- एकाकी झुंज देणाऱ्या सॅम करनला या गोलंदाजाने दिला सर्वाधिक त्रास


