Share

रंग बरसे भीगे चुनर वाली…! होळीच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी शेअर केला खास फोटो

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मग बॉलिवूड कसे मागे राहिल? बॉलिवूड सेलिब्रिटीही होळीच्या मस्तीत धूंद आहेत. बॉलिवूडमध्ये होळी नेहमीच धूमधड्याक्यात साजरी केली जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे चित्रपटसृष्टीतील होळी पार्टी कॅन्सल करण्यात आल्या आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चनही मोठ्या उत्साहात होळी साजरे करीत असत. यावर्षी होळीच्या निमित्ताने त्याने स्वत: चे जुने फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CM-SzvwhALf/?utm_source=ig_web_copy_link

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईफ फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते आपली पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह होळी खेळताना दिसत आहेत. फोटोत अभिषेक बच्चन खूपच लहान आहे आणि तो अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर बसला आहे. या फोटोत जया बच्चन यांना ओळखणेही कठीण आहे. ‘रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे…होली है।’ असे कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!