मुंबई : तैमुर संदर्भातल्या बातम्या वाचणं काहींना बऱ्याचदा आवडत नाही. अशा बातम्यांवर अनेकजण राग व्यक्त करताना दिसतात. पण अनेकांना दीड वर्षाच्या तैमुर बद्दल उत्सुकताही असते. याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमूर जन्मापासूनच कायम चर्चेचा विषय बनला आहे. माध्यमांमध्ये देखील नेहमी त्याच्या बातम्या असतात. मात्र तैमुरची लोकप्रियता ही खान कुटुंबाच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय बनली आहे.
खान कुटुंबीय राहत असलेल्या घराबाहेर तैमूरचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यामुळे जो दररोज गोंधळ उडतो, त्याने शेजारी वैतागले आहेत. ही अडचण लक्षात घेत शेजाऱ्यांनी फोटोग्राफर्सविरोधात तक्रार दाखल केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

