मुंबई : सैफ अली खान त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. अनेक चित्रपताच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजपर्यंत सैफअली खानला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली भारत सरकारच्या वतीने त्याला पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे. आयुष्याच्या यशस्वी टप्प्यावर असताना सैफ अली खानला मात्र एका गोष्टीसाठी स्वतःची लाज वाटते. सैफने स्वतःबद्दलची एक गोष्ट उघडपणे सांगितली आहे. तो म्हणाला, मला माझ्या एका भूमिकेची खूप लाज वाटते. सैफला भूमिकेवर प्रयोग करायला आवडतं. एकदा तो त्याच्या भूमिकेसाठी एक स्त्री बनला होता. त्याच्या ‘हमशकल्स’ चित्रपटात तो स्त्री बनला आणि संपूर्ण लुक तसाच ठेवला होता. आता त्या भूमिकेची आपल्याला लाज वाटते, असे सैफ ने म्हटले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, सैफ अली खानने साजिद खानला त्याच्या लूकसाठी दोषी ठरवले आहे. चित्रपटातील त्याच्या एका फोटोमध्ये तो समुद्रकिनारी धावत होता. ते चित्र पाहून सैफ म्हणाला, ‘अरे देवा, साजिद, आमचे काय केले? हे काय चालले आहे? हे खूप लाजिरवाणे आहे. त्याने देखील उघडपणे सांगितले की ,जेव्हा ते लूक ठरवत होते तेव्हा त्याने आणि रितेश देशमुखने खूप चर्चा केली होती.
हा प्रयोग करूनही ‘हमशकल्स’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्यावर सैफ अली खान म्हणाला यावर कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट नव्हती. हे सर्व साजिदच्या मनात होतं.
महत्त्वाच्या बातम्या :


