Share

गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, पैसे मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन्स

Published On: 

बिछीवाडा – राजस्थानमध्ये एक कार पोलिसांनी जप्त केली आहे, ज्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. या कारमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत.

बिछीवाडा पोलीस ठाणे हे गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर आहे. येथून नॅशन हायवे जातो. या ठिकाणी नेहमीच तस्करी केली जाते. त्याचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाशही केला जातो. मात्र, बिछीवाडा पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली आहे.

शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस सध्या दोघांची चौकशी करत आहेत. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!