Share

“सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर…” – सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा”. असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच यासह दिल्लीत पत्राकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आमचे नेते नवाब मलिक म्हणत होते, त्याप्रमाणेच हा सगळा फर्जीवाडा आहे. कुणावर टीका करेपर्यंत अनेक नेते इथे क्लीन असतात. पण कुणी विरोधात बोललं की त्यावर कारवाया होतात, अशी सगळी गंमत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनम्रपणे विचारणार आहे. देश सुधारणार असतील तर त्यांचं मनापासून स्वागत करते. मी स्वतः त्यांचा जयघोष करते.

पण चेरीपिकिंग करायचं असेल… सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर “ये नही हो सकता”. तुम्हाला जर ईडीची रेड करायची आहे तर सगळ्याच पक्षांमध्ये करा. बीजेपीवाल्यांवर जेव्हा आरोप होतात, त्यानंतर ते बीजेपीत येतात. मग त्यांची कारवाई कशी थांबते. this is not fare… या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असावं, अशीच माझी अपेक्षा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!