🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि श्रेयस अय्यरचा संघ कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा गतवर्षीच्या दोन फायनलिस्टमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झालेल्या शेन वॉटसनने युवा पृथ्वी शॉचे कौतुक केले आहे.
शेन वॉटसन म्हणाला, ”मला पृथ्वी शॉ संघातील एक आकर्षक क्रिकेटपटू वाटतो, या तरुण खेळाडूची प्रतिभा प्रशंसनीय आहे, त्याच्याकडे अविश्वसनीय कौशल्य आहेत. मी शार्दुल ठाकूरसोबत पुन्हा काम करेन, मी चेन्नईमध्ये असताना त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती.”
आयपीएल २०२२च्या लिलावानंतर अनेक संघांनी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये नवीन चेहऱ्यांना स्थान दिले आहे. रिकी पाँटिंग संघाचा मुख्य प्रशिक्षक असताना, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन देखील दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. आयपीएल २०२० हंगामात वॉटसन चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
