Share

साधू मनोरुग्ण आहेत, साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत ; वडेट्टीवारांच संतापजनक विधान

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्याने आधीच ठाकरे सरकारची चिंता वाढवली आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

अलीकडे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. ते नागपूर येथून बोलत होते. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला.

संत व साधू हे वेगवेगळे आहे. संत हे समाजासाठी समर्पित आहे. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे पण हे साधू लुबाडणारे असतात. साधू संपत्ती उभारणारे असतात. त्या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ज्याला जी टीका करायची असेल करा, असं थेट इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. ओबीसी समाजाने साधूंच्या मागे लागू नये, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष असणारे आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले कि,  “तुषार भोसले कोण आहे? टीळा लावला व अध्यक्ष झाला म्हणजे विद्वान होतं का? चार पुस्तके त्यांनी वाचली चार पुस्तके आम्ही. आताचे साधू मनोरुग्ण आहेत.

जे समाजाला अंधश्रद्धेत व धर्मांधतेत गुंतून त्यांचं शोषण करतात. त्यामुळे या विरोधात आम्ही बोलणारच,” असंही त्यांनी ठासून सांगितलं. यानंतर या विधानानंतर भाजपकडून टीका होण्याची शक्यता आहे. साधूंबाबत केलेलं वक्तव्यावरुन भाजप घेराव घालू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!