Share

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार

Published On: 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रयोग शाळेची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीची दोन शिक्षकांनी छेड काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्या शिक्षकांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथील नवजिवन माध्यमिक व उच्च माध्यमिक रुपा नाईक विद्यालयात ही घटना घडली. अनुप राठोड (३०) आणि संदीप शिखरे (३२) असे शिक्षकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबातांडा येथील नवजिवन माध्यमिक व उच्च माध्यमिक रुपा नाईक विद्यालयातील प्रयोग शाळा कोरोनामुळे अनेक दिवस बंद होती. यामुळे शुक्रवारी शिक्षकांनी विद्यार्थिनींकडून याची स्वच्छता करण्याचे ठरवले. यासाठी तीन विद्यार्थ्यांनी घेऊन प्राचार्य प्रयोग शाळेकडे आले. त्यानंतर ते कुलुपाची चावी आणण्यासाठी गेले. तर इतर दोन मुली कामानिमित्त बाहेर गेल्या. यामुळे तिथे एकच मुलगी उभी होती. याचा गैरफायदा घेत समोर उभ्या अनुप राठोड व संदीप शिखरे यांनी तिची छेड काढली.

पीडित मुलीने याप्रकरणी या शिक्षकांच्याविरूद्ध पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यावरुन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आधिनियम २०१२ चे कलम ८,१० व १२, भादवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि प्रदीप भिवसने करित आहेत. सध्या दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!