ओटावा: जगभरात मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत जवळपास 6.31लाखहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय. भारतामध्ये ऑगस्ट 2021पर्यंत पहिल्या टप्प्यात 60 कोटी लोकांना लस दिली जाईल अशी आशा व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली होती. ‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लस वापरून भारतात लसीकरण करण्यात येत आहे.
त्यांनतर भारताकडून इतर देशांना कोरोन असीच पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये 25 देशांना 2 कोटी 40 लाख मात्रा पुरवल्या जाणार असून यात शेजारील देशांबरोबरच युगांडा, इक्वेडोर, निकारागुआ, मोरक्को आणि नामीबिया यांचाही समवेश आहे. तर आतापर्यंत भारताने म्यानमार, सेशल्स,मॉरिशस, नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशाला कोरोना लस पाठवली आहे.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी कॅनडासाठी कोरोना लसीची मागणी केली आहे. कॅनडाला इतर देशांप्रमाणेच लस पुरवठा लवकर केला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी जस्टिन ट्रुडोंना दिली. भारताची प्रचंड औषध निर्माण क्षमता आणि मोदींच्या नेतृत्वाखाली या क्षमतेचा जगाला लाभ मिळत आहे. जगाने जर कोरोनावर विजय मिळवला. तर यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे,असे जस्टिन ट्रुडो म्हणाले.
याआधी जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत व्यक्त केलेल्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेनंतर दिल्लीत केंद्र सरकारकडून कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर देखील कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलाय. लोकशाहीनं आपल्याला दिलेला हा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटल होत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार


