Share

‘आता काय चणे फुटाणे खाण्यासाठी सरकारमध्ये थांबलात का?’, सदाभाऊंचा शेट्टींना अप्रत्यक्ष सवाल

Published On: 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सध्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकत आहेत. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी हा खटाटोप करत असल्याची टीका खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. तीन टप्प्यात एफआरपी द्यावी ही आघाडी सरकारनेच शिफारस केली आहे. त्यामुळे हिंम्मत असेल तर तुमच्या आघाडीतील नेत्यांनाच एफआरपीचे तुकडे का केले याचा जाब विचारा. २०१९ प्रमाणे भरपाई देत नाहीत तर अशा सरकारमध्ये राहता कशाला बाहेर का पडत नाही, अशाही सवाल खोत यांनी केला.

तसेच सरकारबरोबरचे घटक पक्ष मगरीचे आसू दाखवत आहेत. ही नौटंकी बंद करावी. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून बाहेर पडलो, असे म्हणणारे आता काय चणे फुटाणे खाण्यासाठी तेथे थांबले आहेत, असा सवाल खोत यांनी विचारला आहे. तसेच सरकारमधून बाहेर पडून दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

शिवाय एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मागणी करणार आहे. एफआरपीचे तीन तुकडे होणार नाहीत. केंद्र सरकार ते करणार नाही. जे काही करेल ते राज्य सरकारकडूनच केले जाईल, अशी माहिती खोत यांनी दिली. ‘एफआरपीचे तुकडे कदापिही सहन केले जाणार नाही. एकरकमीच एफआरपी देण्याबाबत मोदी सरकारही सकारात्मक आहे. केंद्राने कोणतीही शिफारस केलेली नाही. याउलट महाविकास आघाडी सरकारच टप्पे पाडून एफआरपी देण्याच्या हालचालीत असल्याचा आरोप खोत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!