नांदेड – केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्याच्या हिताचे आहेत, गेल्या अनेक वर्षापासून कायद्याच्या बेड्या शेतकऱ्याच्या पायात होत्या ते तोडण्याचं काम या कायद्याने होणार आहे खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट आहे, असे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी लोंढे सांगवी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त केले.
सदाभाऊ खोत म्हणाले, बीटी बियाणे जेव्हा बाजारात आले तेव्हा सगळ्यांनी विरोध केला त्यावेळेस फक्त शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी साहेबांनी त्याच्या समर्थनात रस्त्यावर उतरले तसेच या कृषी कायद्याचे आहे. कायदे देशात लागू होण्याच्या पूर्वीच विरोध होत आहे. याचा अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेतल्या दुकानदाऱ्या या भविष्यकाळात बंद होणार आहेत. शेतकऱ्याला आपला शेतमाल आपल्याला हवे असलेल्या ठिकाणी विकण्याचे, किंमत ठरवण्याचे ,स्वातंत्र्य मिळणार आहे. पण इथली भ्रष्ट व्यवस्था शेतकऱ्याला नेहमी गुलाम आणि बंदिस्त ठेवण्याची भूमिका घेत असल्यामुळे या कायद्याला विरोध करत आहे, मी असं म्हणत नाही की या कायद्यामुळे सगळं काही भलं होईल पण ही एक सुरुवात आहे या कायद्याच्या समर्थनात आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून राज्यात कायदे लागू करा अशी राज्य सरकारकडे मागणी केली पाहिजे असे प्रतिपादन केले.
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंतराव हंगरगे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिली तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल. शेतकऱ्यांना कोणत्या भिकेची गरज नाही पण त्याच्या मालाला योग्य रास्त भाव मिळाला पाहिजे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यावेळी म्हणाले की जिल्ह्यात गेल्यावर्षी सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून कंपन्यात गब्बर झाल्या पण शेतकऱ्याला कवडीचीही मदत सरकारने केली नाही. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सुद्धा जिल्ह्यात पीक विमा लागू केला नाही, पिक कर्ज द्यायला बँका टाळाटाळ करत आहेत
यावेळी शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, आशा शिंदे, रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर , भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ.सचिन उमरेकर ,रयत क्रांती जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे ,ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचाळ, कार्यक्रमाचे आयोजक आनंद लोंढे, प्रमोद लोंढे ,भीमराव लोंढे ,कीर्तीरत्न सावळे किशनराव लोंढे, व पंचक्रोशीतील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
उमरा येथे जाऊन भीमराव शिरसाट यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले त्यावेळेस सदाभाऊ खोत म्हणाले, भीमराव शिरसाट दिव्यांग शेतकरी तहसील कार्यालयावर गळफास घेऊन आत्महत्या करतो , राज्यातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण सरकार निष्ठुर झाली आहे, सर्व प्रशासन हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करत आहे पण रयत क्रांती संघटना या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- धार्मिक अधिकारापेक्षा जगण्याचा अधिकार महत्त्वाचा; सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

