Share

Sadabhau Khot : “लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो…”, सदाभाऊ खोत यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केला असून असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नसल्याचे म्हटले आहे. यावरूनच आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.

“बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पण लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्यजी हे आपण कसं बरं विसरलात?”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले कि, “बंडखोरांनी २० जून रोजी बंड पुकारला. मात्र धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणं हेच पर्याय आहे. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!