Share

आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं; सदाभाऊ खोत यांचं सूचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो एसटी कर्मचारी मागील 14 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल चार ते साडे चार तास खलबतं झाली. त्या बैठकीत तोडगा निघाला नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिली आहे. आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं, असं आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीच्या विलीनीकरणासाठी नेमलेल्या समिताचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजत आहे.

भावनिक विचार न करता आर्थिक दृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी 10 वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शिष्टमंडळाशी चर्चा करुन सरकारसोबतच्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. हा तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही अनिल परबांनी म्हणाले आहेत. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!